Marathi Ukhane for Women
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट
आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
--- चं नाव घ्यायला --- अडवले
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात
घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल
गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून ........ रावांची मी सॉभाग्यवती झाले
गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर
माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा.
... नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.
0 comments: